कोल्हापुर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अनंत ज्ञानसागर अकॅडमी कोल्हापूर या निवासी संकुलाचा खेळाडू कु.शिवप्रसाद राधिका शामराव पाटील याने 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशस्वी कामगिरीसाठी त्याला संस्थेचे संस्थापक मा.श्री.निलेश लंबे, अध्यक्ष मा.श्री.शामराव पाटील, उपाध्यक्षा सौ.स्वप्नाली लंबे, खजानिस सौ.राधिका पाटील, जिमखाना प्रमुख प्रा. संभाजी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले तसेच बॉक्सिंग प्रशिक्षक अनुराग सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सर्व शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
