कर्मवीर पतसंस्थेला महापौर धीरज सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट

Admin
By -



              कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे नुतन महापौर मा. धीरज सुर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी त्यांचे शाल  व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

           स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉ. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा सादर केला. संस्थेच्या ठेवी १३०० कोटी आहेत, रु.१००२ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. भागभांडवल रु. ५७ कोटी असून १५२ कोटी स्वनिधी आहे. संस्थेची सभासद संख्या ६९००० आहे. संस्थेची गुंतवणुक ४०० कोटी इतकी आहे. संस्थेचे खेळते भांडवल १५२२ कोटी असून एकूण व्यवसाय रु.२३०० कोटी इतका आहे. संस्थेच्या ६७ शाखामधून ग्राहक सेवा दिली जात आहे.

              सत्काराला उत्तर देताना महापौर मा. धीरज सुर्यवंशी यांनी आपण सांगलीच्या विकासासाठी काम करणार असून सांगलीच्या समोर उभे असणारे महत्वाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल याची ग्वाही दिली.

           त्यांनी संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले. कर्मवीर पतसंस्थेने सांगली शहर अंतर्गत सुधारणेबाबत सुद्धा विचार करावा त्यासाठी आपण योग्य सहाय करु असा शब्द त्यांनी दिला. संस्थेचा व्याप खुप मोठा व्हावा व त्यातून सांगलीचा नांवलौकीक व्हावा अशा शुभेच्छा महापौर धीरज सुर्यवंशी यांनी दिल्या.

           यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अशोक आण्णा सकळे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील मुख्य कार्यकारी  श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह मान्यवर व संस्थेचे सेवक या कार्यक्रमास उपस्थित होते.