नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Admin
By -



          नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

              सुरुवातीला भारताचे महान भौतिकी शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर  यांच्या हस्ते करण्यात आले.    
    
          याप्रसंगी इयत्ता सहावीतील कृष्णा एकातपुरे व राजवीर डुबुले या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या डॉक्टर सी व्ही रमण व एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्राचे प्रदर्शन करण्यात आले.
         इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक श्री सुभाष सदामते यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान गीत व पर्यावरण गीत सादर केले.
         याप्रसंगी डॉक्टर सी व्ही रमण यांची AI माध्यमातून बनवलेली संशोधन कार्याची चित्रफीत तसेच मंगळ यानाचे प्रक्षेपण कसे होते हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले 
      इयत्ता पाचवीतील तथास्तु गौंडाजे  यांने विज्ञानातील शास्त्रज्ञाची रोमांचक कथा सांगून विज्ञान विषय आवडीचा असल्याचे मत व्यक्त केले. तसेच इयत्ता तिसरी मधील रुद्र निगडे हा विद्यार्थी वजन काट्याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे यांच्या वेशभूषेमध्ये येवून  त्याने वजन काट्या चा शोध कसा लावला? हे सांगितले
    यावेळी विज्ञान सहाय्यक शिक्षिका सौ सुनिता भोसले मॅडम यांनी डॉक्टर रामन यांच्या संशोधन कार्याची माहिती दिली. डॉक्टर रामन यांच्या रामन परिणाम* या याविषयी माहिती तसेच 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून  का साजरा केला जातो याविषयी सांगितले.
           गणित सहाय्यक शिक्षक श्री एस बी सरगर सर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होत असलेली प्रगती, व त्याचा योग्य रीतीने आपण वापर करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे तसेच विज्ञाननिष्ठ विद्यार्थी बनले पाहिजेत असे सांगितले.
               प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये , सर्वात जास्त शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जीवनातील कष्टदायी प्रवास त्यांच्या आईची शिकवण याविषयी माहिती दिली. *समाजासाठी अविरत झटणारे अनेक शास्त्रज्ञ, यांच्या कार्याचा आदर्श* घेऊन विद्यार्थ्यांनी आपली संशोधक वृत्ती वाढीस लावावी असे सांगितले.विधायक कार्यासाठी विज्ञानाचा वापर करण्यात यावा, तसेच अंधश्रद्धेला दूर ठेवले पाहिजे , विज्ञानाने मिळालेल्या सुख सुविधांचा हव्यास करू नका. विद्यार्थ्यांनी प्रश्नाची उकल केली पाहिजे* तसेच विज्ञानाचा उपयोग शेती तंत्रज्ञानासाठी ,नवनवीन उपकरणे तयार करण्यासाठी करावा . विज्ञानाच्या साह्याने सत्यता पडताळून पाहावी व  वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा* असे मत मांडले.
        विज्ञान उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या *विज्ञान साहित्यातून शास्त्रीय तत्व विशद* केले यामध्ये *एका डोळ्याने एकच वस्तू दिसते परंतु दोन डोळ्यांनी दोन वस्तू का नाही दिसत* ? *झाडांना वेदना होतात का?* अशा प्रश्नांची उकल शोधली. तसेच ऑर्बिझ बॉलची किमया, बायोटिक कार्बन एक्सपोजर, एसिड बेस रिएक्शन , वॉटर फाउंटन ,सेफ्टी डिवाइस, भोंदूबुवाच्या अंधश्रद्धेचा उलगडा, थर्माकोलची योग्य विल्हेवाट तांब्याची भांडी व चांदी यावर पर्यावरणाचा परिणाम, सुरक्षित काठी, इन विजीबल इंक, जनतेचा परिणाम, नॉन न्यूटनियॉन फील्ड,  चुंबकाची शक्ती पाण्यातही कमी होत नाही  असे अनेक विविध प्रयोग प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून त्या पाठीमागचे शास्त्रीय तत्व जाणून घेतले. 
            विज्ञान आणि पर्यावरण यांचे संरक्षण होईल, त्याचा नाश होणार नाही तसेच अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता, सर्वांनी विज्ञाननिष्ठ राहू असा संकल्प केला. 
  सौ सुनीता पाटील व ललिता गौडाजे   यांनी विज्ञान उपक्रमाचे परीक्षक म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाचे आभार प्राथमिक विभागाच्या गणित सहाय्यक शिक्षिका सौ प्रतिभा डुबल मॅडम यांनी केले . तर सूत्रसंचालन कु. प्राची चव्हाण व अदिती खोत इयत्ता नववी या विद्यार्थिनीनी केले.
        हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर,   सर्व  शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले
Tags: