डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या वतीने महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बार्टीच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात आला. बार्टीच्या व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी बार्टीचे सांगली जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, समतादूत संयोगिता हेरकळ, संग्रामसिंह छत्रे उपस्थित होते...
3/related/default
