नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मातृ पितृ पाद्यपूजनाचा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहात संपन्न

Admin
By -


          

        सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास  विभागामार्फत  भावस्पर्शी कार्यक्रम  मातृ-पितृ पाद्यपूजन पाल्यांच्याकडून  मातापित्यांचे पाद्यपूजन या संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
              या भावस्पर्शी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रियंका खाडे, (. पी. एस.  आय.आर्थिक गुन्हे* शाखा,-सांगली)असे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व लाभलेले होते.
  तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक ट्रस्टी श्री. प्रवीण लुंकड,  श्री अधिकराव पवार (नव कृष्णा व्हॅली स्कूल मुख्याध्यापक), तरणुम मुल्ला (पोलीस कॉन्स्टेबल) तसेच अभ्यास विभागाचे पालक प्रतिनिधी सौ . सुजाता चव्हाण श्री. शीतल भोरे उपस्थित होते.
     उपस्थित मान्यवरांचे स्वागत अभ्यास विभागातील बालचुमनी    *इतिहासाचे रंग रूप हें आले या नगरा*
 स्वागतगीताने  केली 
         कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व विद्येची देवता  सरस्वती  पूजन  करून करण्यात आली.
               प्रेममय,त्यागमय, आणि सेवामय अशी त्रिवेणी संगम असलेली माता व वरून कठोरपणा दाखवणारे पण मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी अविरत कष्ट करणारे वडील अर्थात पिता अशा आई- बाबांची आपण यज्ञापूर्वक सेवा केली पाहिजे आई म्हणजे तुमच्या आयुष्यातील साठवलेली "पुण्याई" असते.आणि वडील हे कर्म करून आयुष्यभर मिळवलेली "कमाई" असते आई वडील माझे नगळत मागे असलेली मायेची सावली असते म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितृ देवो भव असे म्हटले जाते.म्हणूनच मातृ-पितृ पाद्यपूजन हा एक सुखद व भावस्पर्शी सोहळा नव कृष्णा व्हॅली अभ्यास विभागांमध्ये आयोजित केलेला होता.
           
       अभ्यास विभागात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे चित्रफित पालकांना दाखवण्यात आली.
               शाळेमध्ये घेण्यात येणारे विविध उपक्रम  शिक्षण यामुळे मुलांच्या बालमनावर झालेल्या झालेल्या संस्काराचे अनुभव सौ. पुनम माळी या व्यक्त करताना म्हणाले की चिमुकल्यांच्या हातातून आपल्या चिमुकल्याच्या हातून आपला आई-वडिलांचे करतात तेव्हा तो क्षण आपल्याला आपल्या  संस्कृतीच्या आणि संस्काराची खरी जाणीव करून देतो आणि हे सर्व आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या मुळे घडते. संस्कार आणि संस्कृती सोबत मुलांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम ही तितक्या सहजतेने तत्परतेने मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत शिकवण्याची कलाही सर्व शिक्षकांमध्ये कमालीच्या अवगत आहे. या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करणारे आपल्या शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन.

आणि सौ  सुजाता चौगुले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की आपल्या संस्कृती आई-वडिलांना देवाचे स्थान मानले जाते ते आपले पहिले शिक्षक पहिले मित्र आणि आयुष्याचे शिल्पकार आहेत.
 आपला आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव आपल्याला कधीच होत नाही आणि ती
 प्रेमात व्यक्त करू शकत नाही मात्र आज  शाळेने आमच्या मुलांना त्याचे जाणीव करून दिली. याबद्दल शाळेचेआभार मानते.अशा प्रकारचा भावस्पर्शी कार्यक्रम आम्ही आजच अनुभवत आहोत. 
    मातृ-पितृ पाद्यपूजनाचा हा भावस्पर्शी सोहळा पालक आनंद अश्रुने अनुभवत होते.
             

           शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकार पवार आपले प्रास्ताविक  करताना म्हणाले की सामाजिक जीवनामध्ये मिळणाऱ्या व संस्कारांना दूर ठेवून सुसंस्काराचे धडे देणाऱ्या शाळांच्या पैकी नव कृष्णा व्हॅली स्कूल ओळखली जाते. शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात. जेणेकरून मुलांच्या बाल मनावर संस्कार होऊन सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
    प्रमुख पाहुण्या सौ. प्रियंका खाडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या  की.- सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुलांच्या वरती नेमके काय संस्कार करावे हा प्रश्न पडतो.
            मुळात संस्कार सांगण्यापेक्षा  पालकांनी स्वतःच्या कृतीतून संस्कार मुलांच्यात रुजवावा.
     मुलाने भविष्यात काय व्हावे यापेक्षा मुलाने आलेल्या स्पर्धेमध्ये कसे टिकून राहावे या दृष्टीने   पालकांनी  मुलांना घडविणे   काळाची गरज आहे. सध्याच्या काळात मुलांच्यावर संस्कार करताना पालकांनीच मोबाईलचा वापर करणे टाळावे.
             मुलांच्या मनात एखादी गोष्ट  आत्मसात किंवा मिळवत असताना ती स्वतःच्या चांगल्या वागण्यातून कृतीतून मिळवावी.  मुलांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे..
       संस्थेच्या संस्थापक ट्रस्टी श्री. प्रवीण  लुंकड*आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की - सध्याच्या स्पर्धेच्या आणि A. I  युगामध्ये वावरत असताना मुलांच्या पुढे जी प्रलोभन येतात त्यावर मात करण्याची जाणीव मुलांच्यात निर्माण करावी.
              ,A. I. चा वाढत जाणारा प्रभाव जर कमी करायचा असेल तर पालकांनी आधी स्वतःवरती कंट्रोल करून मोबाईलचा वापर कमीत कमी करणे गरजेचे आहे. तरच तुम्ही मुलांना त्या पद्धतीने सुदृढ करू शकता. 
मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार मुलांच्यात एखादी कला जोपासण्याची आवड निर्माण करावी.
              संस्कारक्षम भावस्पर्शी मातृ पितृ पाद्यपूजनाचा हा कार्यक्रम छानपणे पार पडला त्याबद्दल आयोजकांचे आणि पालकांचे अभिनंदन.
      कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी, पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ललिता गौडाजे तर आभार प्रदर्शन योगिता विसापुरे  यांनी केले
Tags: