लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Admin
By -




             महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) लघुलेखन परीक्षा व ऑनलाइन दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 10 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) ऑनलाईन पद्धतीने 30 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले.

ही योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. पात्र गटांमध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी आदींचा समावेश आहे.

           ऑनलाइन अर्जासोबत गत आर्थिक वर्षाचे (सन 2025-26) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन 2026-27) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र,  राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र,  लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. T.C./L.C./ शालेय निर्गम उतारा इ.), परीक्षा (माहे जानेवारी 2026) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) याची स्पष्ट प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

Tags: