शांतिनिकेतन बालविकास केंद्राच्या सौ. सीमा पिसाळ यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

Admin
By -



         शांतिनिकेतन बालविकास केंद्र इंग्रजी माध्यम, सांगली येथील शिक्षिका सौ. सीमा पिसाळ यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दुर्गा प्रतिष्ठानतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

         विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन, अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यांची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. प्रमुख पाहुणे सौ. शोभा मोहिते , शारदा मोहिते , दुर्गा प्रतिष्ठान सदस्य श्रीमती मंगल गवळी आणि सौ. शुभांगी गवळी, पालक प्रतिनिधी सौ. आरती खंडागळे माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. प्रतिमा भोसले आणि मुख्याध्यापिका सौ. सविता खांडेकर मॅडम उपस्थित होत्या.  त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  


Tags: