राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने अधिकराव पवार सन्मानित

Admin
By -


            नव कृष्णा व्हॅली स्कूल, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकराव विठ्ठल पवार यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला
           महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा १२ सप्टेंबर २०२६ रोजी अकोला येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पदवीधर आमदार (अमरावती) मा. श्री. धीरज लिंगाडे यांच्या हस्ते अधिकराव विठ्ठल पवार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
               सूरज फाउंडेशनमध्ये अनेक वर्षे कार्यरत राहून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत नवनवीन व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे, तसेच विद्यार्थ्यांचे हित व गरज ओळखून त्यांना सदैव योग्य मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्या कुशल मार्गदर्शनाचे आणि प्रेरणेचे हे फलित मानले जात आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार, शिस्त, सुशील चारित्र्य व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत अधिकराव पवार यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ, प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. विजय वडेट्टीवार, मा. श्री. साजिद खान पठाण, मा. श्री. धीरज लिंगाडे, मा. श्री. प्रकाश तायडे, मा. श्री. प्रकाश सोनवणे, मा. श्री. महेंद्र गवई यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
           तसेच संदीप शेवळकर, प्रा. डॉ. नितीन देडळकर, अमित बोयडे, सचिन दुमिस यांच्यासह सर्व निमंत्रित मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिळवलेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन प्रवीण शेठ लुंकड व सेक्रेटरी श्रीशैल्य मोटगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, पालक प्रतिनिधी, पालक व विद्यार्थी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन
Tags: