विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Admin
By -



          सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली भेट; गणेशोत्सव नियमांचे पालन करून साजरा करण्याचे केले आवाहन

          शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छांनी उत्साहात साजरा झाला. सामाजिक, राजकीय, सार्वजनिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट, दूरध्वनी आणि समाजमाध्यमांद्वारे डॉ. गोऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

           उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, ना.भरत गोगावले , जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर, विधानपरिषद उपसभापती श्री. सचिन अहिर, खासदार श्री. संदिपान भुमरे, खासदार श्री. मिलिंद देवरा, विधानपरिषद सदस्य श्री. प्रसाद लाड, आमदार श्री. राजेश क्षीरसागर, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना सचिव श्री. संजय मोरे, शिवसेना पुणे शहर प्रमुख श्री. प्रमोद (नाना) भानगिरे, शिवसेना उपनेते श्री. राहुल शेवाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. भाऊसाहेब चौधरी, शिवसेना उपनेत्या श्रीमती तृष्णा विश्वासराव, श्रीमती कला शिंदे आदींनी समाजमाध्यमांद्वारे डॉ. गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, खासदार श्री. नरेश म्हस्के, खासदार श्री. श्रीरंग बारणे, खासदार अॅड. संजय देशमुख, विधानपरिषद सदस्य श्रीमती चित्रा वाघ, माजी आमदार कांता नलावडे , आमदार श्री. मंगेश कुडाळकर, माजी आमदार श्री. मोहन जोशी, शिवसेना प्रवक्त्या श्रीमती शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेते श्री. इरफान सय्यद, श्री. आनंद जाधव आणि माजी आमदार श्रीमती कांता नलवडे यांनी दूरध्वनीद्वारे डॉ. नीलम गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या.

             दरम्यान, पुणे शहरातील पत्रकारांनीही डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी राज्यातील विविध सामाजिक व सार्वजनिक प्रश्नांवर सकारात्मक संवाद झाला. जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील संवाद सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले.

               महिला व बालकांची सुरक्षितता, सामाजिक न्याय, नागरिकांच्या विविध समस्या आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रश्नांवर काम करताना समाजातील विविध घटकांशी संवाद आणि समन्वयाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून विधायक पद्धतीने काम करण्याचा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.


           वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील शिवसेना पदाधिकारी, रवींद्र धंगेकर, किरण साळी, रमेश कोंडे , बापु शिंदे , सुदर्शना त्रिगुणाईत, पुजा रावेतकर. कांता पांढरे, मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, हितचिंतक आणि पत्रकारांकडून मिळालेल्या शुभेच्छांबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी सर्वांचे आभार मानले. विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांचे प्रेम, विश्वास आणि शुभेच्छा ही सार्वजनिक जीवनात काम करण्याची प्रेरणा देणारी शक्ती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
------
Tags: