थोरात अकॅडमी शांतिनिकेतन मध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंधन... लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी आणि शांतिनिकेतन डे बोर्डिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये निवासी शिकत असलेल्या शंभरहून अधिक मुलींनी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच पर्यावरण पूरक रक्षाबंधन मध्ये शांतिनिकेतन परिसरातील वृक्षांना आपला सखा मानून त्यांना राख्या बांधण्यात आल्या. पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे हे ओळखून वृक्षांनाच भाऊ मानण्याची संकल्पना शांतीनिकेतनच्या परंपरेचा एक भाग आहे.
याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमात प्रसंगी प्रमुख उपस्थिती नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे संचालक गौतम भाऊ पाटील उपसंचालक डी एस माने अकॅडमी इन्चार्ज डॉ. समिता पाटील उपमुख्याध्यापक अनिल कुंभार उपस्थित होते.
