सागाव (ता. शिराळा) येथे आज (ता. ४) जन आरोग्य समितीची बैठक संपन्न झाली. तीत वरील निर्णयाची घोषणा करण्यात आली. पंचायत समिती सदस्य सौ. सायली पाटील, सरपंच सौ. अस्मिता पाटील प्रमुख उपस्थित होते.
जि. प. सदस्य श्री. नाईक म्हणाले, सागाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत येणाऱ्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी मी आग्रही आहे. लोकांना शासकीय योजनांचा फायदा करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्षमपणे आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत झाल्यापासून रुग्णांचा ओघ वाढतो आहे. त्यामुळे येथील यंत्रणेची जबाबदारी वाढत आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने गवत काढणी सुरू होताच सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यावरील लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध कराव्यात.
ते म्हणाले, एप्रिल ते जुलै २०२६ आरोग्य केंद्रांतर्गत गावात जेवढ्या महिला प्रसूती झाल्या त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वगळता. खासगी रुग्णालयात झालेल्या प्रसूतीबाबत थेट रुग्णांशी संपर्क साधून ते तिकडे का गेले, याची माहिती गोळा करावी. ग्रामीण भाग असल्याने येथील विशेषता शेतात काम करणाऱ्या महिलांमध्ये हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी जाणवते. परिणामी प्रसूतीवेळी शस्त्रक्रिया करावी लागते. त्यासाठी प्रभागवार महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे नियोजन आरोग्य केंद्राने करावे. त्याचा प्रसार व प्रचार प्रभावीपणे करावा.
प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम. घड्याळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मागील सभेचा वृत्तांत वाचला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सोई, सुविधा, उपचाराबाबत सूचना केल्या. बैठकीस ‘विश्वास’चे संचालक बाबासो पाटील, माजी सरपंच तात्यासो पाटील, माजी उपसरपंच शिवाजी माने, जयसिंग पाटील, ग्राग्रामपंचायग्रामपंचायत सदस्या शोभा पाटील, माधवी पाटील, बुगड गुरुजी, विष्णू पवार, जितेंद्र देशमुख, दादा तळेकर, संजय संकपाळ, दत्ता तानवडे, सत्यजित पाटील, मयूर सकपाळ, संदेश पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. असिम मुलाणी, आरोग्य निरिक्षक एस. आर. देवकर व आरोग्य केंद्राचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
------------
*नागरिकांच्या सूचना व मागण्या :* रक्तांच्या तपासण्या, सर्पदंशावरील लसीची उपलब्धता, रात्रीच्या वेळी उपचार होणे, गप्पी माश्यांसाठी पाण्याची टाकी बांधणे, रुग्णसंख्येत वाढ करणे, शासकीय खर्चाने उपचार होणाऱ्या आजारांचे फलक लावणे, प्रसूती संख्येत वाढ करण्याबाबत प्रयत्न करणे.
----------
