सांगलीकरांच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब

Admin
By -



                सांगलीची अवघ्या ७ वर्षांची चिमुकली आर्या सुकन्या सुप्रसाद कुंभार हिने आपल्या सर्वांच्या मनावर आज पर्यंत तिने अभिनयाच्या माध्यमातून राज्य केलेली आहे. आपल्या अभिनयाने तिने सर्वांच्या मनावरती आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे . तिच्या असामान्य अश्या अभिनयाने आणि कर्तृत्वाने सांगलीचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झालेले आहे. आर्याची प्रमुख भूमिका असलेला “सजा चौरंगा" हा मराठी लघुपट युनायटेड किंगडम (UK) येथे झालेल्या First Time Session Volume 7 International Short Film Festival यासाठी भारतातून निवड झालेला एकमेव मराठी लघुपट आहे. 


                 ही केवळ आर्यासाठीच नव्हे, सांगलीसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.



        यापूर्वी ही या लघुपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आर्याला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून हि गौरविण्यात आलेले असून, जपान ग्लोबल फिल्म फेस्टिव्हलमध्ये "Best Child Artist" पुरस्कारही तिला मिळालेला आहे.



                  बालकलाकार आर्या हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल नित्यधन फायनान्स कंपनीच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि अभिनय क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी नित्यधन फायनान्स कंपनी कडून तिलाा शुभेच्छा देण्यात आल्या.
                 यावेळी या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags: