चला जाणूया नदीला या शासन अभियानाच्या माध्यमातून कृष्णा नदी संवाद यात्रा

Admin
By -
चला जाणूया नदीला या शासन अभियानाच्या माध्यमातून कृष्णा नदी संवाद यात्रा तांबवे डोह पासून ते राजापूर बंधारापर्यंत चित्ररथ यात्रा आयोजित करण्यात आली होती ती आज सकाळी हरिपूर येथे आगमन होताच माननीय जिल्हाधिकारी मैनाक घोष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे साहेब  उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थित चित्ररथ राजापूरकडे प्रस्थान झाला.


या कार्यक्रमात हरिपूर ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री अरविंद तांबेकर, डॉ. रवींद्र व्होरा, कृष्णा महापूर समिती अध्यक्ष डॉ.अभिषेक दिवाण,प्रभाकर केंगार, सर्जेराव पाटील, संजय कोरे, प्रदीप वायचळ, प्रमोद माने, सचिन सगरे आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.

 अरविंद तांबेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद यात्रेतील  संकलन केलेली इतिवृत माहित थोडक्यात सर्जेराव पाटील यांनी  दिली. तसेच ग्रामपंचायतचे प्रश्न गावातील समस्या याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली. सांगलीतील मोठ्या प्रमाणात नदीत मिसळणारा शेरीनाला आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात सध्याची चाललेली वाटचाल याबाबत वारणा उद्भव योजना चुकीची कशी आहे याबाबत हरिपूर कृष्णा नदी संगमावर साहेबांच्या समोर निदर्शनास आणून दिली पाण्यासाठी होणारा खर्च अपव्याप टाळावा व चांदोली तून पाणी आणावे यावरती भर देण्यात आला. शेरीनाला प्रश्न गेली 50 वर्षे झालं सुटला नसून तो सोडण्याच्या दृष्टीने त्यात काय केले पाहिजे याची माहिती दिली तसेच यासंदर्भात सर्व माहिती बैठकीच्या माध्यमातून आपण घेऊया असे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी सांगितले,



 विशाल नरवडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले चला जाणूया नदीला या उपक्रमामुळे शासनाला विशिष्ट स्तरावर मदत करणे शक्य आहे .क्रमप्राप्त आहे त्या सर्वांना निधी त्याची तरतूद आमच्या स्तरावर आम्ही करू आणि चांगला उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला सुद्धा त्याची मदत होणार आहे असे सांगितले 

 जिल्हाधिकारी सांगली यांनी बोलताना सर्व गोष्टीचा आढावा मी घेतलेला आहे महापुरामुळे संकट उभारात जरी असले तर त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मार्ग काढायचे याबाबत विस्तृत माहिती आम्हाला मिळाली आहे यावर आपण पुन्हा एकदा बसून चर्चा करून या प्रश्नावर ती निश्चित मार्ग काढूया असे सांगितले शेरीनाला तसेच वारणा पाणी योजना यावरती महापालिका आयुक्त यांच्यासोबत आपण नक्की बैठक घेऊ असे आश्वासन यावेळी दिले तसेच ग्रामपंचायत हरिपूरच्या वतीने गावातील समस्या सोलर पॅनल ची अंतिम मंजुरी बाबत मागणी केली असता नरवडे साहेबांनी त्याचा पाठपुरावा करू असे सांगितले हरिपूरला ब वर्गात पर्यटन क्षेत्र असल्याने बराच निधी या क्षेत्राच्या विकासासाठी आणता येईल आणि त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू अशी आश्वासन दिले आणि उपस्थित यांचे आभार मानून या ठिकाणी चित्ररथ राजापूरकडे रवाना करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य अरविंद भाऊ तांबवेकर, लोकनियुक्त सरपंच राजश्री ताई तांबवेकर, उप सरपंच सुनीता ताई शेरिकर, ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी कल्पना राठोड मॅडम, पोलीस पाटील उमाकांत बोंद्रे,ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Tags: