२२ व्या सूरज फिडे रेटिंग स्पर्धेचा कोल्हापूरचा सम्मेद शेटे विजेता तर सांगलीचा समीर कठमाळे उपविजेता
नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली व सूरज स्पोर्टस ॲकॅडमी , कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 22 सूरज आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेला कृष्णा व्हॅली बॅड्मिंटन हॅाल , एम.आय.डी.सी. कुपवाड येथे सुरूअसलेल्या स्पर्धेच्या नवव्या व अखेरच्या फेरीत कोल्हापूरचा सम्मेद शेटे व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबीत सोडविला अर्ध्या गुणासह सम्मेदने रू. २१०००/- च्या रोख पारितोषिकासह कै. सूरजमल चषक पटकाविले तर श्रीराजला ७.५ गुणासह रू. १००००/- च्या रोख पारितोषिकासह चौथ्या स्थानावर जावे लागले.
आंध्रप्रदेशचा खॅाजा लतिफ व सांगलीचा आंतरराष्ट्रीयमास्टर समीर कठमाळे यांच्यातील डावात लतिफने रचलेल्या चालीना समीरने प्रत्युत्तर देऊन ३९ व्या चालीला लतिफचा पराभव करून समीरने ७.५ गुणासह रू. १५०००/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले.
कोल्हापूरचा आदित्य सावळकर व सोलापूरचा मानस गायकवाड यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला अर्ध्या गुणासह मानसने ७.५ गुणासह रू. १२०००/- च्या रोख पारितोषिकासह तिसरे स्थान पटकाविले तर आदित्यला ७.५ गुणासह रू. ७०००/- च्या रोख पारितोषिकासह पाचव्या स्थानावर जावे लागले.
सांगलीची श्रीया हिप्परगी व कोल्हापूरचा ऋषीकेश कबनूरकर यांच्यातील डावात श्रीयाने ऋषिकेशचा ३८ व्या चालीला पराभव करून ७.५ गुणासह ५५००/- च्या रोख पारितोषिकासह सहावे स्थान पटकाविले.
पुण्याचा ओम लामकाणे व सांगलीचा अभिषेक पाटील यांच्यातील डावात अभिषेकने ओमचा ३५ व्या चालीला पराभव करून ७.५ गुणासह अभिषेकने रू. ४०००/- च्या रोख पारितोषिकासह सातवे स्थान पटकाविले.
पुण्याचा भुवन शितोळे व कोल्हापूरचा विवान सोनी यांच्यातील डावात विवानने ३५ व्या चालीला भुवनचा पराभव करून ७.५ गुणासह विवानने रू. ३०००/- च्या रोख पारितोषिकासह आठवे स्थान पटकाविले.
कोल्हापूरचा व्यंकटेश खाडेपाटील व सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण यांच्यातील डावात व्यंकटेशचा विक्रमादित्यने ४० व्या चालीला पराभव करून ७ गुणासह रू. २०००/- च्या रोख पारितोषिकासह नववे स्थान पटकाविले.
रत्नागिरीचा यश गोगटे व पुण्याचा चिराग रेड्डी यांच्यातील डावात यशने चिरागचा ३८ व्या चालीला पराभव करून ६.५ गुणासह रू. १५००/- च्या रोख पारितोषिकासह दहावे स्थान पटकाविले.
नवव्या फेरीअखेर गुण व विजेते – १) सम्मेद शेटे ( कोल्हापूर )-७.५
२) समीर कठमाळे ( सांगली )- ७.५ ३) मानस गायकवाड ( सोलापूर )-७.५
४) श्रीराज भोसले ( कोल्हापूर )-७.५ ५) आदित्य सावळकर ( कोल्हापूर )-७.५
६) श्रीया हिप्परगी ( सांगली )-७.५ ७) अभिषेक पाटील ( सांगली)-७.५
८) विवान सोनी ( कोल्हापूर )-७.५ ९) विक्रमादित्य चव्हाण ( सांगली)-७
१०) यश गोगटे ( रत्नागिरी )-६.५ ११) रिया लाहोटी ( सातारा )-६.५
१२) स्वरूप साळवे (कोल्हापूर )-६.५ १३) वरद मोरे ( पुणे )-६.५
१४) मुदस्सर पटेल ( सांगली)-६.५ १५) हेरंब इंगळे ( पुणे )-६.५
१६) व्यकंटेश खाडेपाटील ( कोल्हापूर )-६ १७) राजदिप पाटील ( कोल्हापूर)-६
१८) शुभम मालाणी (सांगली)-६ १९) आदित्य आळतेकर ( कोल्हापूर)-६
२०) योगेश रावदंळे ( महाराष्ट )-६ २१) महिमा शिर्के ( कोल्हापूर )-६
२२) दिपक क्षीरसागर ( सातारा)-६ २३) श्रेणिक देसाई (कोल्हापूर)-६
२४) स्वरूप जोशी ( कोल्हापूर )-६ २५) अवधूत पवार ( सातारा)-६
रेटिंग १७९९-१७०० १) राजस डहाळे , २) बाळकृष्ण पेडणेकर , ३) सौरीश कशाळीकर
रेटिंग १६९९-१६०० १) दिशा पाटील , २) आदित्य कोळी , ३) शंकर साळुंखे , ४)कश्यप खपांरीया , ५) सम्राज्ञी पाटील, ६) संतोष रामचंद्रे रेटिंग १५९९-१५०० १) सम्मेद पाटील,२) अरीन कुलकर्णी ,३)श्रेयस कुदळे,४)सृष्टी हिप्परगी ५) चिराग रेड्डी , ६) आशिष मोठे
रेटिंग १४९९-१४०० १) स्पर्श लव्हाळे,२)मयुरेश स्वामी,३) अन्वय भिवरे, ४) संस्कृती सुतार,५) सार्थक साबळे, ६) प्रसन्नजीत सावळे ,बिगरमानांकित – १) मल्हार पालकर, २) प्रज्ञेश घोरपडे , ३) मृगेंद्र पवार, ४) आदित्य पवार, ५) संजोग पेठकर ६) सूर्यतेज यादव १६ वर्षावरील-१) ओम लामकाणे,२) निखील कदम, ३) सुशांत कदम, ४) अथर्व आलदर,५) सृष्टी कुलकर्णी ३५ वर्षावरील – १) मोहम्मद लतिफ ,२) सदानंद चोथे, ३) उल्हास तीर्थने ४) अभिजीत चव्हाण, ५) मनोज अनशिंगकर , ५० वर्षावरील – १) प्रकाश कुलकर्णी ,२) शँकर सावंत, ३) प्रदीपकुमार नलावडे ४)दिलीप कुलकर्णी , ५) सुहास देशमाने उत्कृष्ठ महाराष्ट्र राज्य – १) ऋषीकेश कबनूरकर,२) दिव्या पाटील,३) मिहीर पिंपरकर ४) राघव भांदगिरे , ५) अर्णव शेडगे उत्कृष्ठ इतर राज्य – १) श्रीकारा दरबा, २) दिव्या पाटील,३) तेजस चोडणेकर ,४) पृथ्वीराज पाटील,५) विगेश जाके ,उत्कृष्ठ सांगली जिल्हा – १) रोहित मोकाशी २) संदिप माने, ३) शार्विल येडेकर, ४) ऋचित मुके, ५) पियुष माने, उत्कृष्ठ पुणे जिल्हा – १) चिन्मय रेड्डी, २) राज घावले , ३) अव्दिक दास, ४) तेजस माने, ५) स्वानंद वंजिरे उत्कृष्ठ सातारा जिल्हा – १) अपूर्व देशमुख, २) साजिरी देशमुख, ३) लोकजित मुळे, ४) संजय चव्हाण , ५) सत्यजित वेटरकर उत्कृष्ठ सोलापूर जिल्हा – १) अमित मुदगुंडी, २) श्लोक चौधरी, ३) महेश कारंजकर, ४) श्रावणी राजू , ५) हिमांशू भारत, उत्कृष्ठ कोल्हापूर जिल्हा – १) संतोष कांबळे, २) तृप्ती प्रभू, ३) आराध्या ठाकूरदेसाई, ४) वृष्णाली ठक्कर, ५) शिवांश सुतार , उत्कृष्ठ बेळगांव जिल्हा – १) अंशुमन शेवडे , २) शिवंगराज आयहोळी, ३) संईश देसूरकर, ४) अर्पिता मडीवाळ, ५) उर्वी सय्यद उत्कृष्ठ १६ वर्षाखालील– १) भुवन शितोळे, २) आदित्य चव्हाण, ३) अथर्व तावरे, उत्कृष्ठ १४ वर्षाखालील– १) हित बलदवा, २) सर्वेश पोतदार, ३) सार्थक जाधव , उत्कृष्ठ १२ वर्षाखालील– १) वरद पाटील ,२) वेदांन्त बागंड , ३) अर्जित पाटील, उत्कृष्ठ १० वर्षाखालील– १) अथर्वराज ढोले, २) पृथा ठोबरे, ३) अन्वीत गायकवाड, उत्कृष्ठ ८ वर्षाखालील– १) श्रीहरन चौगुले, २) अव्दैत कुलकर्णी , ३) आराध्या देसाई उत्कृष्ठ १) सारा हरोले, २) अर्थव कुंभार , उत्कृष्ठ नवकृष्णा व्हॅली स्कूल– १) श्रीनिधी भोसले , २) विरेन बुजरे , ३) स्वराज पिचके, ४) प्रणव पाटील , ५) आयुष कचरे, ६) आराध्य नाईक , ७) अर्णव पाटील ,उत्कृष्ठ ॲकडमी/ स्कूल– १) केपीज चेस ॲकडमी,२) केन चेस ॲकडमी, ३) डीके चेस ॲकडमी, ४) पी आर चेस वल्ड , ५) विश्वगंगा, ६) चॅम्प चेस स्कूल, ७) व्हीपी चेस ॲकडमी
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ- सूरज स्पोर्टस ॲकडमीचे संस्थापक प्रवीणशेठ लुंकड, चिदंबर कोटीभास्कर, गिरीश चितळे, प्रमोद चौगुले, डॅा. संजय कोगरेकर, मा. संतोष पाटील, डॅा. सौ.पाटील , डॅा. उल्हास माळी, चिंतामणी लिमये यांच्याहस्ते संपन्न झाला.
या स्पर्धेचे पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे ( पुणे ), पवन राठी ( पुणे ), शार्दुल तपासे ( सातारा ), फिडे पंच दिपक वायचळ ( सांगली) रोहिणी तुम्मा ( सोलापूर ),यश लोहाना ( कराड ) प्राची मयेकर ( रत्नागिरी ), अपर्णा शिंदे ( सातारा )रोहित पोळ ( इचलकरंजी), सूर्याजी भोसले ( रेंदाळ ) अंकिता शिंदे , मोहिनीराज डांगे ( इचलकरंजी ) यांनी काम पाहिले.
– सूरज रॅपिड् रेटिंग स्पर्धेचा विजेता सम्मेद शेटे याला विजेतेपदाचा चषक व पारितोषिक देताना प्रवीणशेठ लुंकड, चिदंबर कोटीभास्कर, गिरीश चितळे, प्रमोद चौगुले, डॅा. संजय कोगरेकर, मा. संतोष पाटील, डॅा. सौ.पाटील , डॅा. उल्हास माळी, चिंतामणी लिमये यांच्याहस्ते संपन्न झाला.
