आता लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न

Admin
By -



सरकारने कडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. प्राप्तिकर विभागाच्या अख्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांने लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे .यामुळे महिला व बालविकास विभाग प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न डेटा) चा वापर करून प्राप्तीकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल.

सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती तेव्हा अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे ,अशी अट घातलेली होती ,मात्र ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही या योजनेमध्ये अर्ज केलेला होता एकूण संख्या 2 कोटी 52 लाखाच्या घरात होती