उन्हाळ्यात सतत घाम येतो

Admin
By -



      एप्रिल महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढतच गेलेली दिसून आली.त्याचबरोबर मे महिन्यामध्ये हि उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .

        घाम येणे ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ती अनेक वेळा त्रासदायक ठरू शकते. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी घाम येतो .परंतु सतत घाम आल्याने कपड्याचा ओलसरपणा आणि त्यातून येणारी दुर्गंधी या यामुळे अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी नकोसे वाटते
       उन्हाळ्यात कपड्याची निवड करताना कॉटन कापूस तागा किंवा राणे सारख्या नैसर्गिक फॅब्रिकचे कपडे वापरल्यास घाम त्यामध्ये त्वरित शोषला जातो आणि शरीर थंड राहते. या शिवाय सैलसर आणि हलक्या रंगाचे कपडे उन्हाच्या तीव्रतेपासून आपल्याला वाचवतात. घट्ट कपड्यामुळे त्वचेला हवा मिळत नाही आणि दुर्गंधी व खाज यासारख्या समस्या निर्माण होतात. 
याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आहाराची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मसालेदार तेलकट आणि कॅफेनयुक्त पदार्थ टाळावेत .यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि घाम जास्त प्रमाणात येतो त्याऐवजी नारळ पाणी, ताक, दही, काकडी ,कलिंगड आणि लिंबू पाणी यांचा आहारामध्ये समावेश केल्यास आपल्या शरीराला नैसर्गिक गारवा मिळतो आणि घामावर नियंत्रण मिळवता येते. अति घाम येणे हे हायपर हायड्रोसिस नावाची वैद्यकीय स्थिती असू शकते. 
याचबरोबर दिवसभरात शक्य तितक्या वेळा थंड पाण्याने चेहरा हात पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे याशिवाय मन किंवा पाठीवर बर्फाचा थंड कपडा ठेवून शरीराचे तापमान कमी करता येते