दि २१ रोजी आणि गुरुवार व बुधवार काही भागात अपुरा पाणी पुरवठाहोणार ,काही भागात पाणी येणार नाही

Admin
By -
-जाहीर आवाहन--    


          

नागरिकांना आवाहन करणेत येते की                                                 
             महानगरपालिके कडुन दि.20 मे 2025 रोजी सांगली व कुपवाड शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत जॅकवेल,माळबंगला केंद्र,मिरज रोड बुस्टर पम्प हाउस येथे देखभाल दुरुस्ती अंतर्गत जुन्या व नविन संपची जोडणी, क्रॉस कनेक्शन करणे, टाकी स्वछता व इतर आवश्यक महत्वाची कामे पाणी उपसा बंद ठेवुन हाती घेणेत येणार आहेत.

        बुधवार दि.21/05/2025 रोजी सकाळ वेळेत सर्व भागात कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे अगर काही भागात पाणी पुरवठा होणार नाही.


        माळबंगला केंद्र येथील संप जोडणीचे काम मोठ्या स्वरूपाचे असल्याने याला साधारण दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे

      यामुळे माळबंगला 56 MLD केंद्र 
झोन मधील माळबंगला,आर टी ओ, संजयनगर,यशवंतनगर,आपटा पोलीस चौकी,वसंत कॉलनी,जयहिंद कॉलनी आणि वाल्मिकी आवास या टाक्या मधुन बुधवार व गुरुवारी अपुरा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे ,       अशी माहिती श्री.चिदानंद कुरणे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी दिली आहे 

         तरी नागरिकांनी याची नोंद घेवुन उपलब्ध
 पाण्याचा  काटकसरीने वापर करून  महापालिकेस सहकार्य करावे , ही विनंती 

जन संपर्क अधिकारी
माहिती ,जन संपर्क
 विभाग,मनपा