सोन्याच्या कर्णवेलासाठी फाडले पोट

Admin
By -




      सोन्याचे कर्णवेल शोधण्यासाठी एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांचे पोट फाडावे लागले.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील सोनी येथील एका शेतकऱ्याच्या मुलींनी त्यांचे सोन्याचे कर्णवेल एका ताटामध्ये ठेवून त्यामध्ये पाणी ओतून ठेवले होते. त्या शेतकऱ्यांच्या दोन्ही शेळ्यांनी त्या ताटामध्ये पाणी पिले त्या पाण्याबरोबरच त्या शेळ्यांनी ते कर्णवेल ही गिळले असे ते शेतकऱ्याला माहीत झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी दोन्ही शेळ्या मिरज मधील शासकीय पशु दवाखान्यात नेल्या डॉक्टर विजय ठोके व दवाखान्यातील अन्य सहकार्यांनी शेळीच्या पोटाची शस्त्रक्रिया केली आणि शेळीच्या पोटामध्ये सोन्याची कर्णवेल सापडली.
शेतकऱ्याच्या घरच्यांच्या हलगर्जीपणामुळे शेळ्यांच्या पोटामध्ये कर्णवेल गेली ,पण याचा त्रास विनाकारण त्या शेळ्यांना भोगाव लागला कारण यासाठी त्या शेळ्यांचे पोट फाडावे लागले