आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी ५ लाख २० हजाराची मदत मंजूर .....

Admin
By -



        कु शौर्या दीपक पाटील या दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी ५ लाख २० हजार मदत मंजुरीचे पत्र तिच्या पालकांकडे देताना आ.डॉ.सुरेशभाऊ खाडे .... 




      सोनी, ता. मिरज येथील कु. शौर्या दीपक पाटील, वय २ वर्षे  या बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल  स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रक्कम रुपये ५ लाख २० हजार मंजूर करण्यात आले आहेत. सदर बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी पाठपुरावा केला होता. नुकतीच हि शासकीय मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे पत्र आज मिरजेचे आमदार डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी या बालिकेच्या पालकांकडे सूपूर्द केले. यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल येथे  हि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आ.सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत. या लहान बालिकेवरील हि शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढेही काहीही मदत लागल्यास ती मिळवून दिली जाईल असे आश्वासन यावेळी आ.खाडे यांनी या पालकांना दिले