नितीन गडकरी यांच्या पत्नीकडून अनोखा प्रयोग

Admin
By -





          केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूरच्या धापेवाडा येथे कांद्याचे उत्पादन केलेले आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याचे वजन साधारण आठशे गम ते एक किलो च्या आसपास आहे.

         कांचन गडकरी यांनी त्यांच्या धापेवाडा येथील भक्ति फार्म हाऊस मध्ये हा प्रयोग केला. गडकरी यांनीच बियाणे वापरलेले तंत्रज्ञान याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली. बियाणे नेदरलँड मधून आणले 2.5 किलो बियाणे एका एकर जमिनीत पेरण्यात आले. 45 दिवसांसाठी तेथे रोपवाटिका तयार करून वाढलेली रोपे त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आली .दुहेरी ठिबक सिंचन करण्यात आल्यावर त्या माती सेंद्रिय खत मिसळण्यात आले आणि मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर तेथे करण्यात आला .यामध्ये 25 मायक्रोन प्लास्टिक फिल्मचा समावेश करून त्यात छिद्रे पाडून साधारण 24 हजार रुपये लावले ,या तंत्रज्ञानामुळे जमिनीचा ओलावा कायम राहिला आणि जमिनीचे तापमान संतुलित राहते उत्पादित झालेल्या कांद्याचे सरासरी वजन ४०० ग्रॅम ते हजार ग्रॅम इतके भरले .एका एकरात 12 ते 13 टन उत्पादन घेतले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. जर कोणत्याही शेतकऱ्याला अशा प्रकारे सेंद्रिय शेती करायची असेल तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू असे नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेले आहे.