नवरंग चे आगमन झाले

Admin
By -







नवरंग म्हणजे कोण माहित आहे का , जो आपल्याला पावसाळ्याची चाहूल देणारा म्हणून त्याची ओळख आहे. नवरंग म्हणजेच इंडियन पित्ता हा पक्षी कोकणामध्ये दाखल झालेला आहे तो सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या मधुरावाजाने ओळखला जात आहे, त्याच्या आवाजाने वातावरणामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते

भारतीय पिट्टा हा याला मराठीमध्ये याला नवरंग, बहिरा पाखर, बंदी किंवा पाऊसपेव असे विविध नावांनी हि ओळखले जाते त्याच्या सुंदर रंगांमुळे तो विशेष ओळखला जातो. तेलुगू भाषेत यालाच 'पिट्टा' म्हणजे लहान पक्षी असे म्हणून ओळखले जाते. हा पक्षी हिवाळ्यामध्ये दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो. त्यानंतर तो पावसाळ्याच्या तोंडावर आल्यानंतर तो प्रजननासाठी आपला प्रवास हा थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो.हा प्रवास एप्रिल महिन्यामध्ये श्रीलंका आणि दक्षिण भारतातून स्थलांतर करत हा नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या बाजूने उत्तरेकडे सरकू लागतो. पण आता सध्या तो  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेदिसून येत आहे , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पक्षी निरीक्षकांनी त्यांचे सुंदर फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

        लहान आकाराचा नवरंग हा सुंदर पक्षी त्याच्या स्वतःच्या आकर्षक रंगांमुळे सहज ओळखता येतो. त्याचे पाय लांब आणि मजबूत असतात, तर चोच जाडसर असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर पालापाचोळ्यामध्ये दडलेले कीटक शोधताना दिसतो. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या पक्ष्याचा मधुर आवाज ऐकायला मिळतो. नर आणि मादी नवरंग दिसायला अगदी सारखेच असतात. 

           पश्चिम घाटावरून स्थलांतर करणाऱ्या सुमारे ९० टक्के नवरंग पक्षी गुजरात किंवा त्याहून उत्तरेकडील भागात प्रजनन करतात. मात्र, काही नवरंग पक्षी कोकणातील दाट झाडी असलेल्या भागांमध्ये घरटी बांधून आपले वास्तव्य करतात.