सांगली जिल्हा मधील खुनाचे स्त्र काही केल्या थांबेना.
सांगली जिल्हातील कुपवाड भागातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शेतीची औषध निर्माण करणाऱ्या एका कंपनीत २७ वर्षी तरुण परप्रांतीयाचा खून झाल्याची घटना आज बुधवारी (दि २९) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
या बाबतची अधिक प्राथमिक माहिती अशी की , कुपवाड मध्ये शेती संदर्भातील औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये कामगारांना राहण्याकरिता दोन खोल्या कंपनीने केलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये परप्रांतीय राहतात, तेथे राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्यामध्ये रात्री वादावादी झाली. भडताना त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. घटनास्थळी जेवणाची भांडी सुद्धा पडलेली होती. रात्री दारूच्या नशेत २७ वर्षीय सहकाऱ्याला मारहाण परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला अशी कबुली देत दोन परप्रांतीय संशयित हे सकाळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतः गुन्हा केल्याचे सांगत हजर झाले गेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांनीअशी माहिती मिळत आहे .
पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. तर मदतकार्यासाठी आयुष हेल्पलाइन टीम सुद्धा कार्यरत आहे.