शहरीकरण वाढल्यामुळे अपार्टमेंट संस्कृती पुढे आली आणि एका मजल्यावर अनेक मजले चढवले जातात आणि तेथे टोलेजंग इमारती आपल्याला बघायला मिळतात . जसा मनुष्याच्या राहणीमानाचा परिणाम मनुष्यावरच होताना दिसतो तसाच तो पशुपक्ष्यांवरही होताना दिसून येत आहे .
म्हाकवे ता. कागल येथे गावाच्या पश्चिमेला एकनाथ शंकर शिंदे यांच्या विहिरीवर चिकूच्या झाडाला सुगरणीकडून घरटे बांधण्याचे काम सुरू होते. एका महिन्यापासून सुरू असणाऱ्या घरट्याकडे माळी कुटुंबाने फारसे लक्ष दिले नाही. मात्र एका घरट्याला दुसरे आणि काही दिवसातच तिसरे घरटे लोबकळताना माळी कुटुंबाला दिसून आले आणि हे बघताच ते कुटुंब अवाक झाले.