तुला "अगोदरच्या तीन मुली आहेत" आणि आता ही पती सासू व सासऱ्यांनी लाथांचा प्रहार केला आणि यामध्ये पोटातील दोन महिन्याचे भ्रूण मृत्यूमुखी पडले .
ही घटना घडली नवगाव पैठण येथे गुरुवारी 23 तारखेला सोफिया फिरोज शेख या महिलेला यापूर्वी तीन मुली असून चौथ्या वेळेस ही महिला गरोदर होते .18 जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सोफिया ही पती फिरोज शेख, सासरा अत्कर शेख ,सासू रफिया शेख यांनी तुला अगोदरच्या तीन मुली आहेत आणि आता चौथी ही मुलगीच होणार असे म्हणत तिला मारहाण करण्यास सुरुवात केले. आम्हाला आता मुलगी नको असे म्हणून या सर्वांनी गर्भवती असलेल्या सोफियाच्या पोटावर लाथा मारायला सुरुवात केली .यामध्ये सोफिया गंभीर जखमी झाली, त्या अवस्थेत नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले यावेळी पोटातील दोन महिन्याच्या भ्रूनाचा मृत्यू झाला ,प्रकृती बरी झाल्यानंतर सोफिया हिने पैठण पोलीस ठाणेयेथे फिर्याद दिली .यावरून गुरुवारी रात्री तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मदने हे करीत आहेत