आयोध्या मधील श्रीराम मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा होत असतानाच सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर सुरू असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यात आज श्रीराम आणि सीता यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या दिमाखात ढोल ताशांच्या गजरात, सनई चौघड्याच्या पवित्र सुरात व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
श्रीराम कथेचे प्रवक्ते परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी आज श्रीराम आणि सीता यांच्या विवाह सोहळ्याची कथा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सादर केली. कथेच्या शेवटी श्रीराम आणि सीता यांचा शाही दिमाखदार सोहळा हजारो भाविक भक्तांनी प्रत्यक्षात अनुभवला. स्वागत भाविकांनी उभे राहून केले.भाविकांनी तर या राम आणि सीतेच्या जोडीला अंतकरणपूर्वक हात जोडले. ढोल ताशा तुतारी अबदागिरी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची प्रचंड उधळण करत राम आणि सीतेचे भव्य अशा शामियानामध्ये स्वागत करण्यात आले. बोहल्यावर चढलेल्या राम सीतेचा हा विवाह सोहळा पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. श्रीराम नामाचा प्रचंड जयघोष करत राम सीतेच्या डोक्यावर अक्षता टाकल्याचा एक विलक्षण आनंद भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.
या सोहळ्यात महिला भाविक लाल साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. सदर सोहळ्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, आमदार सुधीर गाडगीळ, सौ मंजिरीताई गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक प्रशासक शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, उपस्थित होते. तर परमपूज्य बजरंग झेंडे महाराज, गुलशन भाई अग्रवाल डिके सोनी आणि परिवार मुंबई, अरुण लोया गुलबर्गा, विनोद घोडावत, मांगीलालजी राठी इचलकरंजी, सत्यनारायण अटल, मूलचंद भाई पटेल, डॉक्टर आर बी कुलकर्णी, राजेशभाई शहा, प्रकाश जाधव दिनेश भाई पारेख लक्ष्मीकांत झंवर, दिपेन देसाई रामपालजी भंडारी, लता गतारे ओम गतारे, डॉक्टर मिलिंद किल्लेदार, श्रीकांत शिंदे, रामेश्वरलाल बांगडी इचलकरंजी आदी मान्यवर या वेळच्या महाआरतीचे मानकरी होते श्री राम कथा व नामसंकीर्तन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी दिली.
यावेळी सादर करण्यात आलेल्या श्रीराम विवाह सोहळ्यात विष्णू झंवर यांनी राजा जनक, नीलीमा झंवर यांनी राणी सुनेना, ब्रिज मोहन सोनी यांनी राजा दशरथ, अरुणा सोनी यांनी राणी कौशल्या, ज्योती बुबना यांनी राणी कैकयी, अंजू राठी यांनी राणी सुमित्रा, संजय दोडिया व प्रकाश मुंदडा यांनी ऋषीमुनी, स्वाती नवलाई व अनुजा कंकणवाडी यांनी दासी तसेच शशांक सोनी यांनी श्रीरामाची व अंकिता सोनी यांनी सीतेची भूमिका पार पाडल्याची माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी पुढे बोलताना दिली.