श्रीराम जन्मोत्सव, सांगलीकरानी अनुभवला

Admin
By -





          सांगलीतील कल्पद्रुम ग्राऊंडवर आयोध्या मधील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापना निमित्त पार पडत असलेल्या श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळा मोठ्या दिमाखात आणि धार्मिक वातावरणात भव्य अशा शामियाण्यात संपन्न होत आहे.
           श्री राम कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा हे गेल्या तीन दिवसांपासून श्री राम कथा सादर करत आहेत. आज त्यांनी रामाच्या जन्मा च्या पाच कारणांचे दाखले देत हा श्रीराम जन्मोत्सव भाविक भक्तांसमोर हुबेहूब मांडला.
           यावेळी श्रीराम जन्माच्या प्रसंगाचे नाट्य रूपांतरण भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेले. परमपूज्य समाधान महाराज यांची वाणी आणि श्रीराम जन्माचा नाट्यप्रसंग पाहता भाविक भक्तांचे हात आपोआपच जोडले गेले. या जन्मोत्सवाचा आनंद भाविक भक्तांनी टाळ्या वाजवून आणि नाचून साजरा केला. श्री राम जन्माचा उत्सव चालू असताना श्रीरामाच्या जयजयकाराने सर्व परिसर दुमदुमून गेला.
यावेळी श्री राम कथा व नामसंकीर्तन सोहळा समितीचे अध्यक्ष प्रमोद जी मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके,सचिव हरिभक्त परायण लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे, सहसचिव हार्दिक सारडा, पापालाल सारडा, ओमप्रकाश झंवर आरबी पाटील विजय संकपाळ डॉक्टर प्रमोद लाड सुरेंद्र बोळाज अण्णासाहेब पाटील विजयराव नवले उपस्थित होते.
             या प्रसंगाच्या आरतीचा मान परमपूज्य झेंडे महाराज गुलशन भाई अग्रवाल आणि परिवार, संजय श्रीनारायण सारडा आणि परिवार, दत्तात्रेय आंबी महाराज,श्री व सौ शांतिनाथ कांते श्रीवस्तव प्रकाश जाधव श्री व सौ राजकुमार भंडारी, श्री व सौ.महेश ठक्कर,श्री वसंत पाटील, मधुजी डाळ्या इचलकरंजी, गोवर्धन बियाणी, एडवोकेट शेडबाळे,श्री व सौ सावकार शिराळे श्री व सौ दौलतराव लोंढे
          यावेळी करण्यात आलेल्या श्रीराम जन्मोत्सवाच्या नाटिकेमध्ये दशरथ राजा प्रतीक संजय सारडा, कौशल्या राणी जागृती प्रतीक सारडा, सुमित्रा राणी प्रीती गोपाळ सारडा, बालस्वरूप श्रीराम अभिनव प्रणय सारडा, ऋषिमुनी संजय डोडिया, प्रकाश मुंदडा, दासी प्रीती धीरज सारडा व राणी प्रकाश मुंदडा आदींनी आपल्या भूमिका पार पाडल्या.