मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्त गर्दी करत होते. या मध्ये सलमान नावाचा व्यक्ती या टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्याला आयुर्वेदिक तेल लावत होता.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर महापालिकेकडून अखेर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा व्यक्ती कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्याला आायुर्वेदिक तेल लावत होता. सलमानचं हे आयुर्वेदिक तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी महावीर गार्डनमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी वाढल्यानंतर अखेर आता आठ दिवसांनंतर महापालिकेला जाग आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागानं आक्षेप घेत सलमानकडे आयुर्वेदिक तेलासंदर्भात चौकशी केली असता
.
टक्कलग्रस्तांना लावत असलेल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधना संदर्भात पुरावे सादर करण्याचा आदेश देखील महापालिकेकडून सलमानला देण्यात आला आहे. महावीर गार्डन मध्ये यापुढे टक्कलग्रस्तांना तेल न लावण्याच्या सूचना महापालिकेकडून सलमानला देण्यात आली आहे.