या कारणांसाठी हत्ती जाणार रजेवर

Admin
By -



      बसंती ,रूपा ,अजित, मंगला ,राणी ,प्रियंका, गणेश ,लक्ष्मी ,कुसुम हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासकीय हत्ती कॅम्प मध्ये कार्यरत आहेत . या नऊ हत्तींना येत्या 20 जानेवारी पसून 29 जानेवारी पर्यंत रजेवर पाठवण्यात येणार आहे .त्यामुळे हाती कॅम्पस दहा दिवसांसाठी बंद राहणार असून या हत्तींचे या कालावधीमध्ये चेपिग करण्यात येणार आहे.

         सध्या थंडी वाढत असल्यामुळे वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या पायाला भेगा पडतात. त्यामुळे त्यांना चालताना त्रास होत असतो .या भेगांवर आणि दुखणाऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टीत देण्यात आलेली आहे. अशी सुट्टी दरवर्षी त्यांना देण्यात येते ,यादरम्यान औषधचा शेक 40 ते 45 प्रकारच्या जडीबुटी पासून औषध तयार केले जाते. वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रममध्ये चेपिंगचा लेप तयार करतात तो पहाटे व सायंकाळी हत्तीचे पाय शेकतात