तासगाव कवठेमंकाळ विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापले

Admin
By -





           तासगाव कवठेमंकाळ विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापले आहे.काल दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेने सावर्डे गावातील आजपर्यंतच्या गर्दीचा विक्रम मोडला, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामधीलच एक भावनिक उदाहरण असे की सावर्डे गावामधील अमित कुमार जाधव हे टूव्हिलर मेकॅनिक म्हणून तासगाव मध्ये आपला व्यवसाय करतात ,त्यांचा मुलगा चिरंजीव राजवीर अमितकुमार जाधव (वय वर्ष ६)याने आपल्या भिशीमधील साठवलेले आजपर्यंतचे पैसे दहा हजार रुपये हे संजयकाका पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी काल काकांच्याकडे सुपूर्द केले. एका लहान मुलाला सुद्धा संजयकाकांच्या विजयाची उत्सुकता पाहून सभास्थळावरील सर्व लोक भावनिक झाले.