तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्यावर भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळेच तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगाव साठी दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काकांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका पाटील यांनी व्यक्त केला
महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी तासगाव शहरातून ज्योती काकी पाटील यांनी प्रचार फेरी काढली यावेळी शहरातील जेष्ठ नागरिक युवक युवती व महिलांशी संवाद साधताना ज्योतिकाकी बोलत होत्या
यावेळी बोलताना ज्योती काकी म्हणाल्या , तासगाव शहरातील युवा पिढीचे भविष्य करण्यासाठी काकांनी शिक्षण मंडळाला नवसंजीवनी दिली पालिकेच्या शाळा आज दिमाखात उभ्या आहेत केंद्र सरकारच्या संस्थांच्या माध्यमातून निधी आणून शाळेतील मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू दिल्या. महाराष्ट्रातच पहिल्यांदाच गोरगरीब मुलांसाठी मोफत स्कूलबस चालवल्या. निश्चितच त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे
यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या , शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली होती लोकांना गावातून फिरणे अवघड झाले होते. याचा विचार करून राज्य शासनाच्या बजेट मधून काकांनी तासगाव विटा रस्ता ते भिलवडी नाका जोडण्यासाठी तब्बल 85 कोटी रुपये आणले तर राष्ट्रीय महामार्ग मधून तब्बल पावणे दोनशे कोटी रुपयांचा निधी बायपास साठी आणला आहे त्यामुळे शहराची वाहतुकीची रिंग रोडची गरज पूर्ण होणार आहे या रिंग रोड मुळे शहरातील व्यापार उदीम वाढेल केवळ वाहतुकीचाच नव्हे तर तासगाव शहराच्या प्रगती चा वेग या रिंग रोड मुळे वाढणार आहे काही जणांना कुठला बायपास हे माहीत नसल्यामुळे जुन्या रस्त्यावर फटाके उडवून आपणच निधी आणल्या कांगावा केला मात्र तासगावची जनता सुज्ञ आहे त्यांना खरं खोटं माहिती आहे. तासगाव शहराला दोन राष्ट्रीय महामार्गावर आणणाऱ्या संजय काकांना बायपास करणे अवघड नाही हे लोकांना माहिती आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या तासगाव पालिकेची पुण्या मुंबईतील कार्पोरेट ऑफिसला लाजवेल अशी सुसज्ज इमारत असेल , किंवा मार्केटची इमारत असेल यामुळे तासगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तासगावच्या लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून तब्बल साडेसात कोटी रुपयांचे कस्तुरबा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल काकांनी उभे केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागांमध्ये सरकारी दवाखाने सुरू झाले आहेत त्यामुळे निश्चितच तासगाव शहराचे आरोग्य चांगले राहणार आहे
येणारे काळात सुद्धा तासगाव शहरात अजून काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे काकांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहावे असे आवाहन शेवटी ज्योती काकी पाटील यांनी केले