तासगाव कवठेमंकाळ मतदार संघात पायाला भिंगरी लावून शिवानी ताई पाटील यांचा प्रचार
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे म्हणजेच तुपात साखर पडणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला आर्थिक सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना सक्षमपणे चालण्यासाठी महायुती सरकारच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे म्हणूनच तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे असे आवाहन शिवानी ताई प्रभाकर बाबा पाटील यांनी केले
संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ शिवानी ताई पाटील यांनी तासगाव व कवठेमंकाळ तालुक्यातील गावागावात पायाला भिंगरी लावून प्रचार दौरा केला
यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांच्या दौऱ्याला दिसून आला
यावेळी शिवानी ताई पाटील यांनी महिलांशी संवाद साधला यावेळी अनेक महिलांनी यावर्षी दिवाळी सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेमुळे अतिशय आनंदात साजरी केल्याचे सांगितले. अनेक महिलांनी या दिवाळीला आपली मनपसंत वस्तू खरेदी केल्याचे घरात नेऊन दाखवले. शासनाच्या एखाद्या योजनेमुळे एखाद्या कुटुंबात कशाप्रकारचा आनंद निर्माण होऊ शकतो हे आपण अनुभवल्याचे शिवानी ताई पाटील यांनी सांगितले
यावेळी महिलांशी बोलताना शिवानी ताई म्हणाल्या , तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील तब्बल सव्वा लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. या पुढील काळात आपल्याला महिना 2100 रुपये मिळणार आहेत. त्या म्हणाल्या हे पैसे केवळ महिलांना मिळालेले नाहीत तर ते संपूर्ण कुटुंबाला मिळाले आहेत कारण महिलांना मिळालेले पैसे हे कुठल्या हॉटेलवर जात नाहीत, कुठल्या व्यसनात जात नाहीत. कुठल्या वायफळ खर्चात जात नाहीत तर ते संसाराला लागतात हे सगळ्यांना माहिती आहे . या पैशामुळे थोडा का होईना हातभार प्रत्येकाच्या कुटुंबातील संसाराला लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ही योजना बंद व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली होती सर्वसामान्य महिलांना पैसे मिळणार म्हणल्यावर या सावत्र भावांच्या पोटात दुखू लागले अगदी निवडणुकीच्या नावावर आयोगाकडे तक्रार करूनही या योजनेला मिळणारे पैसे थांबवले. त्यामुळे महिलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना याचा जाब विचारला पाहिजे. तसेच ही योजना सक्षमपणे चालण्यासाठी, तसेच आता या योजनेतून 2100 रुपये म्हणजेच वर्षाला जवळपास 25 हजार रुपये मिळवण्यासाठी आपल्याला महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणावे लागणार आहे. त्यासाठी तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीशी आपण रहावे असे आवाहनही यावेळी शिवानी ताई यांनी केले.
शिवानी ताई म्हणाल्या , तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात विरोधकांना विजयाची मोठी खात्री असल्यामुळे अतिशय उन्माद त्यांनी सुरुवातीच्या काळात केला. लहान थोर न बघता अरेरावीची भाषा वापरली आमच्या अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी करण्याचा प्रयत्न केला काकांच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपला पराभव समोर दिसू लागल्यामुळे सध्या भावनिक करून मते मागण्याचा प्रकार सुरू आहे. पहिल्या सभेत कोणीही समोर या म्हणणारे आता संभाळून घ्या म्हणू लागले आहेत . अनेक ठिकाणी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र तासगाव कवठेमंकाळची स्वाभिमानी जनता अशा प्रयत्नांना भिक घालणार नाही असा विश्वास शिवानी ताई पाटील यांनी व्यक्त केला