आमच्या भगिनींना लाडक्या बहिण योजनेचे पंधराशे रुपये देऊन ऐन सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांचे दर वाढवून दुपट्टीने वसुली करणाऱ्या महायुती सरकारला त्यांची जागा येत्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी व सर्व सामान्य जनता दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. अंकली , टिंबर एरिया नवीन वसाहत, भाडवले गल्ली या परिसरामध्ये अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या . प्रचारादरम्यान येथील युवक युवतीनी, महिलांनी , नागरिकांनी जयश्री मदन पाटील यांचे जंगी स्वागत करुन येथील असलेल्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला . त्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन जयश्री मदन पाटील यांनी दिले.
या प्रचार बैठकाप्रसंगी बोलताना माजी नगरसेविका शेवंता वाघमारे म्हणाल्या की विद्यमान आमदार गेली पाच वर्षे फिरकले सुध्दा नाहीत मग त्याना काय कळणार येथील समस्या. येत्या निवडणुकीत आमच्या प्रभागामधील जनता मदन भाऊंना आदरांजली म्हणुन जयश्री मदन पाटील यांना मोठ्या मत्ताधिक्याने विजयी करणार असल्याचे ही मत व्यक्त केले . प्रभाग क्र 16 मधील भाडवले गल्ली येथील महिलांनी प्रचार बैठकांचे आयोजन केले होते . तसेच अंकली गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करुन गावामध्ये लागणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, व्यायाम शाळा, गावठाण समस्या या लवकरात लवकर मार्गी लावु अशी ग्वाही अंकली येथील महिलांना व नागरिकांना देण्यात आली.
यावेळी , प्रकाश मुळके , अशोक मासाळे , शेवंता वाघमारे , संजय शिंदे, अनुप आस्वा , सागर माने , यशवंत माळी, फारुख शेख, लुकमान मालदार, यासर बल्बन , इमरान मालदार, कयुम मिस्त्री, रंनजीत जाधव , सपान शेख , लालूभाई मिस्त्री, इन्नुस महात, उत्तम साखळकर, मनोज पाटील, कुलभुषण पाटील, दादासो शिंदे, महावीर पाटील, नितीश चौगुले, डाॅ अभय पाटील, पंकज पाटील. राजेंद्र सुर्यवंशी, प्रदीप कोलप, अंकुश चौगुले, भरत खवाटे, गोटु चौगुले, प्रविण पाटील, निलेश पाटील , संदीप पाटील, सचिन पाटील, निखील पाटील, प्रणव पाटील, वैभव खवाटे, बाहुबली लठ्ठे, तामगोंडा पाटील, संदीप भुसारे, विजय पाटील, धनराज पवार, अभिजित जवळेकर, अर्थव काशीद, तुषार कांबळे, साक्षी चौगुले, प्रियदर्शनी पाटील, वैशाली पाटील , सविता शिंदे, तायना पवार, द्रोपदी जवळेकर, शंकुतला जवळेकर, पुष्पाराणी जाधव, अनिता कराळे यांच्यासह पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.