महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुरेशभाऊ दगडू खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे. मिरज शहर व मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येंने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनिय आहे. मतदार संघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सुरेशभाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेवुन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळाला आहे अशी भावना जनमाणसात दिसत आहे. मतदार संघामधील नेटके नियोजन, जनसंपर्क आणि महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनामुळे हि निवडणूकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडूण येतील असा विश्वास जनतेत दिसून येत आहे.
मिरज ग्रामीण भागातील निलजी बामणी, बोलवाड, व्यंकोचीवाडी, पायाप्पाची वाडी, एरंडोली या गावामध्ये डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला. या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग व मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता. गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनाचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा, विज बिलात सवलत देण्यात आली. महिला भगिनींसाठी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी, एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबविल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे. वृध्दापकाळ पेन्शन धारकांच्या पेन्शन रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणुन त्याचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. मिरज विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वोपरी प्रयत्न केले आहेत. मिरज शहर असो वा मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदार संघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. या गावचा विकास करताना दुजाभाव न करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सर्वांची अशीच सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशिर्वाद द्यावेत.
यावेळी निलजी बामणी, बोलवाड, व्यंकोचीवाडी, पायाप्पाची वाडी, एरंडोली भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.