कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस परिक्षेत्रामध्ये घडलेल्या गुन्ह्याचा अत्यल्प कालावधीमध्ये छडा लावत गुन्हेगारांना अटक करणारे, एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे व नियमितपणे आपल्या संस्थेस सहाय्य करणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असणारे.कुपवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, आदरणीय श्री. दीपक भांडवलकर साहेब यांना सांगली जिल्हाचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कामाची दखल पूर्ण जिल्ह्याने घेत त्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत असताना* सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम व नव कृष्णा व्हॅली शिक्षण समूह तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना मराठी माध्यमचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. अधिकराव पवार सर वस्तीगृहप्रमुख प्रदीप पाटील सर यांच्या हस्ते सत्कार समारंभ व सदिच्छा देण्यात आल्या.
कुपवाड एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा सत्कार
By -
September 10, 2024