आवळाईच्या उपसरपंचपदा प्रथमच तृतीयपंथी हेगडे यांची निवड

Admin
By -








             आवळाई (ता. आटपाडी) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी तृतीयपंथी दिलीप हेगडे यांची निवड करण्यात आली. उपसरपंचपदी निवड करून आवळाई ग्रामपंचायत ने समाजामध्ये वेगळ्या आदर्श निर्माण केला. त्याचबरोबर भेदभाव दूर करून तृतीयपंथी यांना समाजाच्य मुख्य प्रवाहात आणण्याचे पहिला प्रयत्न केला असल्याची लोकनियुक्त दिलीप हेगडे निवडून आले होते.

 शेरेवाडी पिसेवाडी व आवळाई असे कार्यक्षेत्र आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश शिपोरे व ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी यांनी काम पाहिले. आटपाडी तालुक्यातील आवळाई  गावात मारी माता देवी मुळे लौकिक मोठा आहे या ठिकाणी देवीची यात्रा भरते 

       सध्या येथे भाजपचे सत्ता आहे. गावची पाच हजार लोकसंख्या असून तीन वार्ड आहेत पैकी वार्ड क्रमांक दोन मधून दिलीप हेगडे हे निवडून आले आहेत 

        समाजामध्ये आम्हाला मानसन्मान दिला जात नाही मात्र येथील सरपंच गजेंद्र पिसे दिलीप भाऊ बोराडे जयश्री शेंडे प्रियंका वाघमारे यांनी माझ्या निवडीसाठी प्रयत्न केले इथून पुढे समाजासाठी मी काम करीन. 
              दिलीप हेगडे, उपसरपंच