शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीने राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी बेताल व्यक्तव्या विरुद्ध आंदोलन

Admin
By -




शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीने शनिवारी राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी बेताल व्यक्तव्या विरुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मुती स्थळावर जाऊन अभिवादन करुन मा राहुल गांधी यांनी दीनदलित शोषित लोकासाठी असलेले आरक्षण समुष्टात आणण्याची भूमिका व्यक्त केली त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वात आणि सर्व पदाधिकारी यांच्या समवेत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला उपस्थित सुनीताताई मोरे, रुक्मिणी आंबिगिरे, मुनीरा शेख, पायल पाटिल, जयश्री थोरात, प्रज्ञा वाळके, राजश्री कोळी, आकाश माने, समीर लालबेग, संदीप ताटे, सुरज कासलीकर, सुखदेव काळे, सुनील साबळे, समाधान मोहिते, बापू देशमुख, कुमार राठोड, सारंग पवार, मनोज जाधव,आणि शिवसैनिक उपस्थित होते.