रांगोळी काढल्यामुळे आपल्या बुद्धीची क्षमता वाढते

Admin
By -







पूर्वीच्या काळी अंगणामध्ये रांगोळी काढण्याची प्रथा परंपरा होती, पण कालांतराने ही प्रथा परंपरा बदलत जाऊन कोणताही सण किंवा एखादा धार्मिक कार्य,.
शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात ही रांगोळी काढूनच होते.
रांगोळी काढणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे
रांगोळी काढण्यासाठी जेव्हा आपण जमिनीवर बसतो त्यामुळे गुडघ्यांची हालचाल ही आपोआप होते आणि रांगोळी ही सकाळीच काढली जात असल्यामुळे सकाळी आपल्या गुडघ्याचा व्यायाम सुरू होतो, तसेच रांगोळी काढताना आपल्या हातांच्या बोटांचे समोरचे टोक हे आपण वापरतो बोटांच्या समोरच्या भागाची आपण जेवढी हालचाल करू तितका आपला मेंदू विकसित होत असतो, असे विज्ञानानुसार सिद्ध झालेले आहे