शांतीसागर महाराज पुण्यतिथी महोत्सवास मा. विश्वजीत कदम यांच्याकडून पाच लाखांची देणगी

Admin
By -



        समडोळी येथे परमपूज्य 108 आचार्य श्री शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. आचार्य श्री शांतीसागर महाराज हे दिगंबर जैन परंपरेतील एक प्रमुख साधू होते. त्यांनी 20 व्या शतकात जैन धर्माचा प्रचार व प्रसार केला. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून सर्व जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी समडोळी येथे झालेल्या शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात अन्नदानासाठी पाच लाख रुपयांची उदार देणगी दिली. या प्रसंगी त्यांनी जैन समाजाचे कार्य आणि योगदान याब‌द्दल विशेष कौतुक केले. त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य आणि तपश्चर्येच्या तत्त्वांची प्रशंसा केली आणि जैन समाजाने समाजातील एकात्मता व शांती प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या या देणगीमुळे महोत्सवाच्या आयोजनाला मोठा आधार मिळाला आणि समाजातील धार्मिक कार्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.

           सदर देणगीचा चेक माननीय विश्वजीत कदम यांनी वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला याप्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील, पलूस तालुका काँग्रेसचे नेते श्री महेंद्र आप्पा लाड, श्री दादासो पाटील (ढंग), श्री माणिक खोत, श्री भरत मगदूम, श्री अरुण ऐतवडे, श्री शितल बेले, श्रीपाल देसाई, श्री आदिनाथ पाटील श्री, अशोक मगदूम, श्री विजय ढोले व इतर समाज बांधव उपस्थित होते