खासदारांच्या मनात चालय काय?

Admin
By -







संजय पाटील यांची एकंदरीत राजकीय वाटचाल आपण दरवेळेस पाहता राजकीय बंड हे त्यांनी वेळोवेळी केलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची आणि शरद पवार यांची झालेली भेट याला सर्वत्र विशेष महत्त्व देण्यात आले आहे ते पुन्हा एकदा राजकीय बंड करणार काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे दहा वर्षाच्या काळात संजय पाटील यांनी जिल्हाभर स्वतःचा गट मोठ्या ताकतीने तयार केला त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात संजय पाटील हे उपद्रव्यमूल्य आहे अंतर्गत विरोध करणाऱ्या नेत्यांना खिडकीत गाठण्याची पाटील यांना ही संधी आहे आणि ही संधी साधून ते उपद्रवमूल्य सिद्ध करणार की नवी राजकीय इनिंग सुरू करणार याची चर्चा सध्या जोर धरत आहे