भिवंडीत भव्य सत्कार सोहळा
शिराळा पंचायत समितीच्या सभापतीपदी श्री. सम्राटसिंग (भैया) नाईक तसेच सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी श्री. विराज (दादा) नाईक यांची निवड झाल्याबद्दल भिवंडी येथे भव्य सत्कार सोहळा व अन्नदान सेवेचे आयोजन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र रहिवासी चॅरिटेबल ट्रस्ट, भिवंडी-मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी कळ्हेर, भिवंडी येथील स्मित वृद्धाश्रमात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विराज नाईक व सम्राटसिंग नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यासोबतच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान सेवा करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास डॉ. दिनेश म्हात्रे, शंकरदादा मोहिते, प्रताप पाटील, राजेंद्र भोईर, भरत पाटील, डॉ. जयेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे धनाजी पाटील, मच्छिंद्र माने, नितीन मस्कर, विकास पाटील, सागर पाटील, संदीप मस्कर, संतोष बोरगे, रघुनाथ पाटील, प्रकाश भाष्टे, सचिन पाटील, युवराज पाटील, राजेश फुके, सुधीर पाटील, दीपक मूलिक, जगन्नाथ पाटील, दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


