संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन पाटबंधारे विभाग दरवाजे काढण्याबाबतचा निर्णय घेणार

Admin
By -


मांगले-बच्चे सावर्डे बंधाऱ्यातील पाणी स्थितीची जि. प. सदस्य विराज नाईक यांच्याकडून पाहणी.



            मांगले (ता. शिराळा) ते बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) दरम्यान वारणा नदीवर असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा काल (ता. ३) पासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फुगी आली आहे. बंधाऱ्यावरील दरवाजे काढले नसल्यामुळे सदरची परिस्थिती उद्भवली आहे. त्याची पाहणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी केली.


           सध्यस्थितीत बंधारा ओसांडून वाहता आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व पाणी पातळी ओसरल्यानंतर पुढील संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन दरवाजाबाबत योग्य निर्णय पाटबंधारे विभाग घेईल, असे कोडोली उपविभागाचे उप अभियंता बी. आर. पाटील व शाखा अभियंता नेहा देसाई यांनी जि. प. सदस्य श्री. नाईक यांना सांगितले. 

          या पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, ‘विश्वास’ कारखाना संचालक सुरेश पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, सुशांत पाटील,  ग्रामपंचायत सदस्य पंडित निकम, शरद चरापले, प्रशांत पाटील, संतोष उर्फ भोला चरापले, दिग्विजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
-------------
Tags: