कावीळ साथ पसरलेल्या लादेवाडीस जि. प. सदस्य विराज नाईक यांची भेट.

Admin
By -

*रुग्णांची विचारपूस, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीस काळजी घेण्याच्या सूचना.




             शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथे काविळीची साथ पसरली आहे. आजअखेर 9 रुग्ण सापडले आहेत. लादेवाडी गाव जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या मतदार संघातील आहे. साथीबाबतची माहिती मिळताच त्यांनी गावाला भेट देऊन पाणीपुरवठ्याची पाहणी व रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. गावात गेल्यानंतर सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व शासकीय आरोग्य केंद्राचे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. साथ पसरण्याची कारणांवर चर्चा झाली. आतापर्यंत केलेल्या व केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली.



            बैठकीनंतर सदस्य श्री. नाईक यांनी गावात फिरून रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी केली. आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागास व ग्रामपंचायतीस दिल्या. पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सरपंच वैशाली खोत, उपसरपंच कृष्णात खामकर, ग्रामपंचायत सदस्य पंडित खोत, सुधा लबडे, स्मिता खोत, ग्रामसेवक रूपाली पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम. घड्याळे, आरोग्य निरीक्षक पी. व्ही. पाटील, आरोग्य साहाय्यक एस. व्ही. जद, आरोग्य सेवक एस. पी. सातपुते, आरोग्य सेवक, आशा सेविका रूपाली खोत, ग्रामस्थ आदी उपस्थित उपस्थित होते.
-----------
Tags: