: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मा.कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सांगली यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सुरज फौंडेशन संस्थेच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली.
यावेळी संस्थेअंतर्गत शालेय परिसरालगतच्या रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा व प्लास्टिक गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे सेक्रेटरी श्री. श्रीशैल लक्ष्मण मोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील कर्मचारी वर्गाच्या वतीने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृक्षारोपणामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासही हातभार लागणार असल्याचे मत संस्थेची ट्रस्टी प्रवीण लुंकड व डायरेक्टर संगीता पागनीस व उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपक्रमातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत स्वच्छ व हरित वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.

