नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये बहुविध कौशल्य शिक्षक उद्बोधन वर्ग उत्साहात संपन्न

Admin
By -






          कवठेमंकळ, दि. २९ मे २०२६ : सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल व जुनियर कॉलेज यांच्या वतीने विसपरिंग टिक बेडग या निसर्गरम्य ठिकाणी सातवा शिक्षक उद्बोधन वर्ग मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.
निसर्गाच्या सानिध्यात आयोजित या कार्यक्रमात डॉ. प्रसाद देवधर यांनी “अध्यापनामध्ये बहुविध कौशल्यांचा वापर” या विषयावर अत्यंत प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान दिले. त्यांच्या विचारांमुळे शिक्षकांना अध्यापनातील नवे आयाम समजले.
तसेच कॉज टू कनेक्ट संस्थेचे संस्थापक अनिरुद्ध बनसोड सर यांनी आजच्या काळात बहुविध कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची गरज स्पष्ट केली.
यावेळी सुरज फाउंडेशनचे संस्थापक ट्रस्टी श्री. प्रवीणजी लुंकड यांनी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेच्या मल्टी स्किल विभागाचे प्रमुख श्री. दत्तात्रेय मुळे सर यांनी २०२७ साठी नियोजित विशेष बहुविध कौशल्य उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.
          या कार्यक्रमादरम्यान सुरज फाउंडेशनच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी श्रीशैल मोटगी सर यांच्याकडे सोपवण्यात आली.
        कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून बहुविध कौशल्य शिक्षक उद्बोधन वर्गाची सांगता करण्यात आली.
Tags: