जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा बाबतची महत्वाची माहिती - प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके

Admin
By -




सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात पेट्रोलचा 2410 किलोलिटर, डिझेल 2732 किलोलिटर तर एलपीजीचा 989.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून 73.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिली.

जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1320 किलोलिटर, बीपीसीएलचा 570 किलोलिटर व एचपीसीएलचा 520 किलोलिटर असा एकूण 2410 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1342 किलोलिटर, बीपीसीएलचा 750 किलोलिटर व एचपीसीएलचा 640 किलोलिटर असा एकूण 2732 किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 799 मेट्रिक टन, आयओसीएलचा 55 मेट्रिक टन व बीपीसीएलचा 135.3 किलोलिटर असा एकूण 989.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 73.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे.


Tags: