भाजप सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निदर्शने

Admin
By -






सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दरवाढ केले आहे त्याच्या विरोधामध्ये सांगली येथील जुना स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपाजवळ भाजपा सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी बोलत असताना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी आजचे मोदी सरकार महागाई रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीमध्ये महागाई रोखून हे मोदी सरकार जनतेला दिलासा न देता विदेश दौरा करीत आहेत व जनतेला सल्ला देत आहेत की आपण थोडे तेल वापरा सोने खरेदी करू नका गाड्या कमी वापरा घरात बसून होमवर्क करा अशा सूचना सांगत आहेत


        परंतु या सूचना पाच राज्याच्या निवडणुकीच्या अगोदर सांगितले पाहिजे होते परंतु तसे न करता आज उपदेश देत आहेत आणि स्वतः परदेश दौरा करीत आहेत अशा या मोदी सरकारच्या विरोधामध्ये थोड्याच दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नेतेंना एकत्र आणून एक भव्य असे आंदोलन छेडले जाईल असे याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार यांनीही आपल्या मनोगतांमध्ये हे मोदी सरकार बारा वर्षांमध्ये कोणते ही ठोस पावले उचलले नाही एखादे हॉस्पिटल निर्माण केले नाही किंवा सर्व जाती समाजासाठी या शाळा आज काँग्रेस पक्षाने उभ्या केल्या आहेत त्यांना मदत न करता धन दांडग्या उद्योगपतींना त्या शाळा इंग्लिश माध्यमातून चालू करण्यास प्राधान्य देत आहेत जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे खते याची आवक थांबलेली आहे ते उपलब्ध करून देण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे अशा शेतकरी कामगार विद्यार्थ्यांच्या विरोधामधील या सरकारच्या विरोधामध्ये डॉक्टर विश्वजीत कदम व विशाल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन उभे करणे व या भाजपा सरकारला खाली खेचणे हेच आपले सर्वांचे काम आहे त्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व घटकातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करूया असे सांगितले यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत डॉ प्रमोद इनामदार नगरसेवक सागर बिरनाळे यांनीही आपली मनोगत व्यक्त केले यावेळी इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष डीपी बनसोडे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले नगरसेवक मयूर पाटील प्रमोद सूर्यवंशी नगरसेवक सागर बिरनाळे नगरसेविका सौ अंजली अजित जाधव सोशल मीडियाचे ललित कुमार दबडे प्रदेश काँग्रेसचे प्रमोद इनामदार सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले माजी नगरसेवक विक्रम दादा सावर्डेकर अजित जाधव सौ प्रतीक्षा काळे प्रकाश बर्डोल नामदेव चव्हाण सुनील भिसे विठ्ठलराव काळे नामदेव पठाडे कांचन खंदारे मीना शिंदे शैलेंद्र पिराळे महेश भंडारे एडवोकेट शाहरुख नदाफ तनवीर मुजावर अजित जाधव विजय सवणे पापा शेख विकास पाटील प्रदीप कारंडे निहाल सरोदे शरण सर्व दे तनवीर मुजावर हणमंत यादव दीपक ताटे रोहित मुंजू इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते
Tags: