महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांगलीचा सिंहाचा वाटा – राजेश नाईक

Admin
By -



       महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत सांगली जिल्ह्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे प्रतिपादन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी केले. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
          पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे यशवंतराव चव्हाण तसेच सहकार चळवळीला बळ देत चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पद्मभूषण वसंतदादा पाटील हे दोघेही सांगली जिल्ह्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर रोजगार हमी योजनेची संकल्पना देणारे विधानसभेचे माजी सभापती वि. स. पागे हेही सांगलीचेच असल्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांगलीचा वाटा खरोखरच सिंहाचा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


            सांगली शहर जिल्हा काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवादल यांच्या वतीने काँग्रेस भवन, सांगली तसेच जुना स्टेशन चौक येथे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी राजेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


          या कार्यक्रमाला काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, एस टी इंटकचे जिल्हाध्यक्ष डी. पी. बनसोडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा करुणा सॅमसन, सौ प्रतिक्षा काळे, मौलाली वंटमुरे, राजू पोतदार कोगनोळी, विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, मीना शिंदे, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, सिद्धाया गणाचार्य, अनिल माने, जय सिंग सावंत अपंग सेलचे सुरेश गायकवाड, प्रशिक, नितीन कांबळे, शुभम शेळके, जितेंद्र शेळके, विश्वास यादव, गणेश वाघमारे, राहुल शिंदे, रोहित गुंजी यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags: