रुग्णवाहिकांचे दरपत्रक वाहनात व हॉस्पिटल गेटवर प्रदर्शित करणे बंधनकारक

Admin
By -

    कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी 14 जुलै 2022 रोजी जिल्ह्यात मंजुरी दिलेल्या रुग्ण्वाहिकांसाठीचे दर पुढीलप्रामणे आहेत.

रुग्णवाहिका (इंधनसहित भाडे)-

       मारुती व्हॅन- 20 किमी अथवा 2 तासांसाठी 450 रु., प्रति किमी भाडे रु. इंधन सहित 12 रु., प्रति दिन (24 तासांकरीता) भाडे रु. (धाव मर्यादा 100 किमी) 3000, मासिक भाडे रु. 90 हजार रु

      टाटा सुमो व मेटॅडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेली वाहने- 20 किमी अथवा 2 तासांसाठी 600 रु., प्रति किमी भाडे रु. इंधन सहित 14 रु., प्रति दिन (24 तासांकरीता) भाडे रु. (धाव मर्यादा 100 किमी) 3500, मासिक भाडे रु. 1 लाख, 5 हजार रु.

       टाटा 407 स्वराज माझदा (टॅम्पो, ट्रॅव्हलर, विंगर) आदींच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने- 20 किमी अथवा 2 तासांसाठी 700 रु., प्रति किमी भाडे रु. इंधन सहित 20 रु., प्रति दिन (24 तासांकरीता) भाडे रु. (धाव मर्यादा 100 किमी) 4500, मासिक भाडे रु. 1 लाख, 35 हजार रु.

   वातानुकुलीत वाहने- 20 किमी अथवा 2 तासांसाठी 900 रु., प्रति किमी भाडे रु. इंधन सहित 19 रु., वातानुकुलीत यंत्रणा कार्यान्वित असल्यास नमूद दारात 10 टक्के वाढ.

     वरील दरपत्रक रुग्णवाहिका मालकांनी त्यांच्या वाहनामध्ये प्रदर्शित करणे बंधनकारक असल्याचे निर्देश सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिले आहेत.

Tags: