अधिक मासानिमित्त कैवल्यधाम येथे “ग्रंथराज दासबोध पारायण” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. १८ मे २०२६ ते रविवार दि. २४ मे २०२६ या कालावधीत हा मंगलमय धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम संपन्न होणार असून, पारायणाची वेळ दररोज सकाळी ७.३० ते १०.०० अशी राहणार आहे.
या पारायणासाठी व्यासपीठ म्हणून धनंजय कोटणीस यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सोमवार दि. १८ मे ते शुक्रवार दि. २२ मे २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत विद्यावाचस्पती डॉ. संजय कोटणीस यांचे “दासबोध चिंतन” या विषयावर प्रवचन होणार आहे.
शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत निला अनिल रूईकर व सहकारी यांच्याकडून “श्रीमद् जगद्गुरू आद्य शंकराचार्य” यांचे संगीतमय चरित्र सादर करण्यात येणार आहे.
रविवारी २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत ह.भ.प. श्री शंतनूजी रिठे (पुणे), स्वामी गोविंददेव गिरीजी यांचे शिष्य, यांचे “ग्रंथराज दासबोध : काळाची गरज” या विषयावर विशेष प्रवचन होणार आहे.
हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा ३००, कैवल्यधाम, संत कोटणीस पथ, सांगली येथे आयोजित करण्यात आला असून, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--------
