सांगलीचा अभिजित कदम ‘वेस्ट झोन इंडिया’ संघाचा उपकर्णधार

Admin
By -



          सांगली जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत, अभिजित कदम याची वेस्ट झोन इंडिया संघाच्या उपकर्णधारपदी (Vice Captain) निवड झाली आहे.
         नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिनांक 5 मार्च ते 10 मार्च 2026 दरम्यान झालेल्या वेस्ट झोन टी-20 आंतरराज्य स्पर्धेत अभिजित कदमने उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पाडली. या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीत 78 धावा केल्या, तर इतर सामन्यांमध्ये 68, 87 आणि 71 धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवत महाराष्ट्राने इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, अभिजित कदमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली.
           यापूर्वीही अभिजित कदम याची आशिया कपसाठी भारतीय संघात निवड झाली होती. चियांगमाई व बँकॉक येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने बांगलादेश व पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत अभिजित कदमला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
             त्याच्या या यशामागे महाराष्ट्र व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष किशोर जगताप, संयुक्त सचिव फहीमभाई तसेच आमदार विश्वजीत कदम,प्रवीण लुंकड अध्यक्ष सुरज फाउंडेशन व माजी आमदार विक्रम सावंत सांगली जिल्हा वेट रन्स क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर बीरजे आणि सचिन दादा जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर 
           सध्या हैदराबाद येथे 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत वेस्ट, ईस्ट, नॉर्थ व साऊथ झोनचे संघ सहभागी होणार असून, या स्पर्धेनंतर भारतीय संघाची अंतिम निवड होणार आहे.
           अभिजित कदमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सांगली जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी अभिमान व्यक्त करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Tags: